Posts

Showing posts from August, 2025

त्रिभाषा सुत्र ... हिंदी हरली मग जिंकले कोण ?

इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा नकोच यात दुमत नाही; पण इयत्ता पाचवीपासून हिंदी कम्पल्सरी असताना आजपावेतो महाराष्ट्राचे कोणतेही नुकसान झाले नाही मग आता पहिलीपासून हिंदी कम्पल्सरी केल्यामुळे महाराष्ट्र कसा काय मागे पडणार आहे हे न उलगडलेले कोडे आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. जो तो आपापली पोळी भाजून घेत आहे असाही एक सूर आळवला जातोय ते ही विचारत घ्यावे लागेल. एक राष्ट्र एक भाषा यासाठी हा सगळा  खटाटोप चालू आहे असे काही जणांचे मत आहे यावर प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते पण याने महाराष्ट्राचे नुकसान होणार आहे हे मात्र अतर्क्य वाटते. पाचवीपासून (म्हणजे इयत्ता पहिली पासून चार वर्ग पुढे) हिंदी कम्पल्सरी असताना आजपावेतो महाराष्ट्राचे कोणतेही नुकसान झाले नाही मग आताच कसे काय होणार ? राष्ट्राची स्वतःची एक भाषा असावी यात वावगे काहीच नाही पण नेमकी कोणती भाषा ही राष्ट्र भाषा असावी हे ठरवताना निकषांची मोजपट्टी लावून तज्ञ मंडळी ते ठरवतील. नाहीतरी देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्ष झाली आहेत तेव्हा राष्ट्राची कुठलीही स्वतःची भाषा नसताना राष्ट्र सुरळीत चालले आहे तेव्हा राष्ट्राची स्वतःची भा...